breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महायुतीत पडणार मिठाचा खडा? माढा लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा

पुणे | माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्याचे खासदार आहेत. माढ्यातील विद्यमान खासदार भाजपाचे असून अजित पवार गटानं या जागेवर मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी पंढरपूरमध्ये अजित पवार गटाच्या स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक-निंबाळकरांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली. माढ्याची जागा अजित पवार गटालाच मिळावी, अशी आग्रही मागणी यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मांडली.

हेही वाचा     –      ‘भाजपात गेल्यावर निवडून येऊ अशी मानसिकता’; बच्चू कडू यांचं विधान चर्चेत 

आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील. माढा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत. ६ मार्चला पक्षानं मुंबईत बोलवलेल्या बैठकीत काय भूमिका मांडावी, हे ठरवण्यासाठी ही बैठक घेतली आहे. माढा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा आणि इथली उमेदवारी पक्ष व युतीचे सहकारी ठरवतील त्या प्रमाणे लढवली जाईल असं आमचं आज ठरलं आहे, असं रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले.

माढ्याच्या विद्यमान खासदारांना मी विरोध केला आहे. त्यामुळे मी त्यांच्या कामावर समाधानी आहे की नाही हे मला विचारण्यात काही अर्थ नाही. कारण त्यांचं काम मला तरी बघायला मिळालं नाही. माढ्याच्या खासदारांना मी पाहिलेलंच नाही. माझ्या दृष्टीने ते अदृश्यच आहेत, असा खोचक टोलाही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विद्यमान खासदारांना लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button