ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त रामायण वेषभूषा स्पर्धा!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार; नव्या पिढीमध्ये देव-देश-धर्म जागृतीचा प्रयत्न

पिंपरी :  ‘देव-देश आणि धर्म’ याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी. महर्षि वाल्मिकी रचित हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य ‘रामायण’मधील प्रभू श्रीराम, माता सीता, बंधू लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांच्या जीवनचरित्रातून मानवजातीला युगानुयुगे प्रेरणा मिळत राहिली आहे. या भगवंत अवतारी चरित्रांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या हेतूने रामायण वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दि. २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. या निमित्त प्रखर हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखली- जाधववाडी येथील रामायण मैदानावर विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच, शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी रामायण वेषभूषा स्पर्धाही होणार आहेत.

सदर स्पर्धा चार गटांमध्ये होणार आहे. ग्रुप- १ – पूर्व प्राथमिक वयोगट, ग्रुप- २ मध्ये ५ ते ८ वयोगट, ग्रुप – ३ मध्ये ९ ते १२ वयोगट आणि ग्रुप- ४ मध्ये वयवर्षे १३ ते १५ पासून पुढे असे नियोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. राजाराम फड 90118 18304 आणि सौ. सुवर्णा भोंगाळे 9921348228 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

हिंदूत्व आणि अखंड भारत या संकल्पनेचा दुवा म्हणजे प्रभू श्रीराम आहेत. सुमारे ५०० वर्षांपासून श्रीक्षेत्र राम जन्मभूमी येथे मंदिर उभारण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. पिढ्यान पिढ्यांनी पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त देशभरात उत्सव साजरा होतो आहे. रामायण वेषभूषा या स्पर्धा सर्वांसाठी आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button