breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे फेसबुक अकाऊंट स्थगित

वॉशिंग्टन– सोशल मीडिया फेसबुकने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट २ वर्षांसाठी स्थगित केले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचारप्रकरणी फेसबुकने ही कारवाई केली आहे, अशी माहिती फेसबुकचे ग्लोबल अफेअर्स उपाध्यक्ष निक क्लेग यांनी ब्लॉकमध्ये दिली आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमेरिकन संसदेत हिंसाचार झाला होता. त्याला माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार होते. ६ जूनच्या या हिंसाचाराला त्यांनी चिथावणी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे हिंसा, शांततापूर्ण सभांना मनाई आणि नागरिकांमध्ये अशांतता पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर करता येणार नाही. आम्ही आमची मूल्य जपत आहोत. सार्वजनिक सुरक्षेला झळ बसू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. राजकीय नेत्यांना असभ्य भाषा आणि गैरवर्तनाची मुभा देणार फेसबुकचे सीईओ मार्क झुबर्ग यांचे धोरण बदलण्याचा विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button