Uncategorized

‘मोदी@9 जनसंपर्क अभियानांतर्गत भोसरीत युवा मोर्चाची ‘रॅली’

युवकांचा मोठा प्रतिसाद : उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
‘मोदी@9 जनसंपर्क अभियानांतर्गत भोसरीत युवा मोर्चाच्या वतीने ‘भव्य ‘रॅली’ काढण्यात आली. भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे व भोसरी चऱ्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांच्या पुढाकाराने भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, राष्ट्रीय सचिव गौरव गौतम, शहराध्यक्ष संकेत चोंधे, महामंत्री सुदर्शन पाटसकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुशील मेंगडे, प्रदेश सदस्य गणेश वरपे, अजित कुलथे सचिन जायभाय, युवा नेते योगेश लांडगे, शहर सरचिटणीस दिनेश यादव तसेच शहर भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मोदी सरकार मागील ९ वर्षांमध्ये गोरगरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असल्याचे सांगितले. मागील ९ वर्षात अनेक योजना सामान्य जनतेसाठी राबवून त्यांना न्याय देण्याचा काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले असल्याचे सांगितले. तसेच, मोदी सरकारने केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चा सदैव अग्रेसर राहील, अशी ग्वाही शिवराज लांडगे यांनी दिली..
**


इंद्रायणीनगर येथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन…
तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या मार्फत 18 ते 25 या वयोगटातील तरुणांसाठी ही संकल्पना राज्यभर राबवण्यात येत आहे. युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर येथे रोहन उगले यांच्या अध्यक्षतेखाली 40 तरुणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button