Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Jalgaon: धावत्या बसवर भलामोठा वृक्ष कोसळला, 12 प्रवासी जखमी

जळगाव : प्रवाशांना घेवून जात असलेल्या भरधाव बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल-भुसावळ रोडवर घडली आहे. यात १२ प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यावल आगाराची बस क्रमांक एमएच २०, बीएल २५४२ ही दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात होती. अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाले. या घटनेत बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-७०), पंडित लक्ष्मण परणकर (वय-६६), शकुंतला विलास चौधरी (वय-६०), सुशिलाबाई किसन धनगर (वय-६०), जोवरा रशीद खाटीक (वय-५०), सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-५२), पद्माबाई रमेश कोळी (वय-५०), मंगला रामदास चौधरी (वय-५५), कल्पना संतोष चौधरी (वय-५५), दीपक येवलू वानखेडे (वय-२४) आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय-१७) असे १२ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमींची विचारपूस करत घटनेची माहिती जाणून घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला आणि डॉ. मनिषा महाजन यांनी उपचार सुरू केले आहेत. १० जणांनी भरलेली रिक्षा कंटेनरने उडवली; सहा जणांचा मृत्यू

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button