breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मनसेकडे लोक प्रश्न घेऊन येतात मग मतदानावेळी कुठे जातात’; राज ठाकरे

मनसेच्या कामाचं कौतुक होतं मग लोक मतदान का करत नाहीत?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी अनेक जण येत असतात. राज ठाकरे त्यांची मदतही करतात. दरम्यान, यावरून राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. ते मुंबईत पार पडलेल्या साधन सुविधा विभागाच्या वर्धापन दिनी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर गेलो होतो. गडावरून खाली आलो तेव्हा गाडीमध्ये बसताना चार-पाचजण आले. त्यांनी चिपळूनवरून आल्याचं सांगितलं. गेल्यावर्षी कोकणात पुरामध्ये नुकसान झालं तेव्हा केवळ मनसेचे कार्यकर्ते मदतीला धावले, इतर कुणीही नाही, असं त्यांनी सांगितलं. बरं झालं भेटलात, कधीतरी आभार मानायचे होते. ते आज मानून टाकतो असं ते म्हटले.

हेही वाचा – Alandi : माऊलींच्या मंदिरात प्रवेशावरून वाद, पोलीसांचा वारकऱ्यांवर लाठीमार

सगळ्या प्रसंगात आपण सगळीकडे धावून जातो. सगळीकडे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो, हे मतदानाच्यावेळी कुठे जातात. नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव भेटायला आले. ते मला अनेक प्रश्न सांगत होते. मी त्यांना त्यांच्या भागातील आमदार, खासदार कोण विचारलं, जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे विचारलं. त्यांनी या या पक्षाची असल्याचं सांगितलं. त्यावर जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल, तर मग माझ्याकडे येता कशाला, असं मी वाचारलं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button