breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

खूशखबर… मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, कुठपर्यंत पोहोचला? वाचा मान्सूनची अपडेट…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रत्येकजण ज्या गोष्टीची वाट पाहत होता. तो दिवस आज आला आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसाने दणका दिला आहे. ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीत मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरा दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीतून मान्सून राज्यात दाखल झाला आहे. मात्र, यावेळी मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने दाखल झाला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून सध्या महाराष्ट्रात रत्नागिरीत दाखल झाला आहे. कर्नाटकातील शिमोगा, हसन आणि धर्मपुरी, श्रीहरी कोटा या शहरांमध्ये मान्सून पोहोचला आहे. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज पाहिला, तर यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरा दाखल झाला आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे
मान्सून कधी येणार याकडे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले होते. राज्यात अखेर मान्सूनचे आगमन झाले आहे. आज 11 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीत मान्सून दाखल झाला आहे.

biperjoy मुळे विलंब
अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सूनला सुरुवात होण्यास उशीर झाला. मॉन्सून अखेर ८ जून रोजी म्हणजे सात दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला. मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर ७ जूनपर्यंत मान्सून येतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात बिपरजॉय वादळामुळे मान्सूनला सुरुवात होण्यास उशीर झाला.

खरिपाच्या कामांना वेग येईल
शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करत आहेत. दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होताच शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या मान्सूनकडून आशा आहेत. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते. त्यामुळेच यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी संजीवनी का ठरणार आहे, हे येत्या काही दिवसांतच कळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button