breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा’; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सूचक इशारा

मुंबई | मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यानंतर संपुर्ण राज्यात मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन करत एक सल्लाही दिला आहे.

मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकीआधी पारदर्शकता येईल, ही अपेक्षा! अशी पोस्ट राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवर केली आहे.

हेही वाचा    –    Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी ‘हे’ स्नॅक्स ठरतील उपयुक्त

मनोज जरांगे यांच्या ‘या’ सात मागण्या मान्य

  1. जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार
  2. सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळणार
  3. आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे
  4. वंशावळी जोडण्याकरता शासननिर्णय
  5. शिंदे समितीला मुदतवाढ
  6. शिक्षणात ओबीसींप्रमाणे सवलत
  7. पुढील अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button