breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरे इज बॅक! शस्त्रक्रियेनंतर पहिलंच भाषणं, तीच स्टाईल, तोच सेन्स ऑफ ह्युमर

मुंबई। महाईन्यूज ।

मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा सभा कधी घेणार, याची उत्सुकता मनसैनिकांना लागली होती. अखेर राज ठाकरे यांनी मंगळवारी रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरी शैलीत भाषण ठोकले. राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांच्या शस्त्रक्रियेचे काही किस्से सांगितले. आपला ट्रेडमार्क सेन्स ऑफ ह्युमर वापरून राज ठाकरे यांनी हे किस्से नेहमीप्रमाणे रंगवून सांगितले. हे सगळे किस्से ऐकताना सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.

राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मी आतमध्ये बसून सर्व भाषणं ऐकत होतो. आपण बसल्यावर कोणी आपली स्तुती करत असेल तर कसनुसं होतं. पण सर्वांची भाषणं अप्रतिम झाली. प्रकाश महाजनांच्या भाषणाला तर ‘वन्स मोर’ मिळतोय की काय, असे मला वाटले, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या हिपबोन शस्त्रक्रियेचा एक किस्सा सांगितला. माझ्यावर हिप बोन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सगळेजण मला प्रश्न विचारत होते. मी एकाला सांगितलं की, माझी हिप (मांडी) रिप्लेसमेंट होणार आहे. त्यावर एकाने विचारले की, हिप रिप्लेसमेंट का करावी लागत आहे? तेव्हा मी म्हटलं की, इतकी वर्षे जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी माझी लावली आहे ना…. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर सभागृहाच एकच हशा पिकला. यानिमित्ताने मनसैनिकांना पुन्हा एकदा राज यांचे ठाकरी शैलीतील भाषण ऐकायला मिळाले.

मी बंड केलं नव्हतं, बाळासाहेब ठाकरेंना सांगून पक्षातून बाहेर पडलो: राज ठाकरे
राज्यात सुरु असलेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बंडाचा सातत्याने उल्लेख केला जात होता. यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी केले ते बंड नव्हते. मी सत्तेसाठी शिवसेनेतून बाहेर पडलो नव्हतो, मी बाहेर जाऊन वेगळा पक्ष काढला होता. हे सगळे मी बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केले होते. मी शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते. मी त्यांच्यापाशी गेलो तेव्हा त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिले आणि नंतर ‘आता जा’ म्हणून म्हटले, असे राज यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button