breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमुंबई

राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत अखेर ठरलं ; भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळणार

पुणे । महाईन्यूज ।

ठाकरे सरकारने दिलेली  राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केराची टोपली दाखवल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं  नवीन बारा नावे राज्यपालांना पाठविण्याची तयारी केली आहे. यात त्यांच्यात एकमत झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी दिली होती. मात्र, राज्यपालांना ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता.

आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदेगटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तेत येताच सगळीच राजकीय समीकरणं बदलत आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या  निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.  विधानपरिषदेची टर्म संपलेलीही अनेक जण लॅाबिंग करत आहेत.

 शिंदे गटातील या संभाव्य नावांची यादी –

रामदास कदम

विजय बापु शिवतारे

आनंदराव अडसुळ किंवा अभिजित अडसुळ

अर्जुन खोतकर

नरेश मस्के

चंद्रकांत रघुवंशी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button