breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, नदी-नाले दुथडी भरून वाहून लागले

सिंधुदुर्ग – मंगळवारी दडी मारून बसलेल्या पावसाने आज कोकणात मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गात सकाळी आठ वाजल्यापासून १४३.५५ मिमी पाऊस पडला आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडीत पडला असून तिथे १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले असून नदी किनारी राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या मोठ-मोठ्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नद्यांना पुर आला आहे. वेंगुर्ले येथील होडावडा पुलावर पाणी आल्याने होडावडा मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली आहे तर कुडाळ येथील भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर सकल भागात पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा येत आहे. तर जिल्ह्यात काही भागात विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे.

कणकवलीत आज पहाटे पासून मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील रामेश्वर प्लाझा या इमारतीत पहाटेच्या सुमारास पाणी शिरले. साखर झोपेत असताना पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची मोठी धांदल उडाली. पार्किंग मध्ये शिरलेलं पाणी हळूहळू तळमजल्यावरील घरात पोचले. अखेर सकाळी सातच्या सुमारास पाणी हळूहळू ओसरले. मात्र या पाण्यामुळे अनेक वस्तूंचे नुकसान झाले. कणकवलीत मागील तीन दिवसात सरासरी 342 मिमी पाऊस पडला आहे. आज पहाटे पासून मुसळधार पडलेल्या पावसाने 11 नंतर विश्रांती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button