breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पिंपरी – वाकडी गावातील मागासवर्गीय तरूणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपरी चौकात निदर्शने करण्यात आली. या घटनेची जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यात सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, महिला अध्यक्षा गंगा धेंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, शहर प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती संघटक वर्षा जगताप, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, धनाजी विनोदे, पुष्पा शेळके, कविता खराडे, यतीन पारेख, मनिषा गटकळ, लता ओव्हाळ, सुभाष गावडे, अरुणा कुंभार, अशोक कुंभार, दीपक साकोरे, मनोज सुतार, विश्रांती पाडाळे, साकी गायकवाड, निलेश निकाळजे, शशिकांत घुले, दत्तात्रय जगताप, सचिन सकाटे, रुपाली गायकवाड, शशिकांत चौंडीकर, मिनाक्षी उंबरकर, उत्तम हिरवे, प्रशांत कडलग, संदीपान झोंबाडे, संतोष वाघेरे, सचिन आवटे, संगीता जाधव, विजय दळवी, सुर्यकांत पात्रे, अभिजीत भालेराव, शिवाजी सुरवसे, योगेश आयवळे, शशिकांत निकाळजे, अभिजीत आल्हाट, आकाश अंकुटे, हरेश लोट, गोविंद वाघेला, बुद्धभूषण निकाळजे, सुनील अडागळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button