breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

हिवाळ्यात पाऊस…आणि आता चक्रीवादळाचाही धोका!

मुंबई – राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असे वातावरण आहे. कारण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात चांगलाच पाऊस कोसळतोय. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे. त्यातच आता हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल. ४ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागाला धडकेल. या चक्रीवादळाचे नाव ‘जोवाड’ असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button