breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात राहुल शेवाळे उच्च न्यायालयात, म्हणाले… महिलेने केली ५६ लाखांची फसवणूक

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महिलेला सोशल मीडियावर बदनामीकारक आणि खोटी विधाने पोस्ट करण्यापासून रोखण्याची विनंती केली. दुबईतील एका ३३ वर्षीय महिलेने शेवाळे यांच्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला असून खासदाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात महिलेने सोशल मीडियावर अनेक पोस्ट्स लिहिल्या असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ट्विट करून तिची तक्रार ‘टॅग’ केली आहे.

अधिवक्ता अखिलेश चौबे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत शेवाळे यांनी या महिलेच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याबद्दल सरकारला कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. याचिकेनुसार, शेवाळे या महिलेची फेब्रुवारी २०२० मध्ये जवळच्या मित्रामार्फत भेट झाली. त्याने महिलेला आर्थिक मदत केल्याचा दावा त्याने केला मात्र अधिक पैसे मिळवण्यासाठी महिलेने त्याचा छळ सुरू केला.

खासदाराची 56 लाखांची फसवणूक
या महिलेने आपली ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप खासदाराने केला असून अधिक पैसे देण्यास नकार दिल्यावर ती (महिला त्यांना धमकावू लागली, असे राहुल शेवाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button