breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही, तर प्रेम दिलं”; राहुल गांधी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काश्मीरमध्ये समारोप

मुंबई : कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेचा आज समारोप होणार आहे. ही यात्रा १४ राज्यांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. आजचा या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी बोलताना राहुल गांधी यांनी काश्मीरमधील नागरिकांचे आभार मानले.

माझ्या लहानपणापासून मी सरकारी घरात राहतोय. माझं स्वत:चं घर नाही. मी कधीच इमारतीला घर मानलं नाही. घर माझ्यासाठी विचार आहे. जगण्याची विचारांची पद्धत आहे. इथे ज्याला काश्मीरीयत म्हणतात, त्याला शून्यता म्हणू शकतो. स्वत:वर विचारांवर आक्रमक करणे, लोकांना जोडणे तर दुसरीकडे इस्लाममध्ये फना म्हटलं जातं. विचार तोच आहे. पृथ्वीवर या दोन विचारधारांचं अनेक वर्षापासून नातं आहे, याला काश्मिरीयत म्हणतात. हाच विचार इतर राज्यांमध्येही आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

जे माझा द्वेष करतात त्यांना माझ्या सफेद शर्टांचा रंग लाल करण्याची एक संधी द्यावी, असा विचार मी केला. पण मी जो विचार केला तेच झालं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही, तर प्रेम दिलं, मिठी मारली. मी सहन केली आहे, पाहिली आहे. जो हिंसा सहन करत नाही, ज्यांनी पहिली नाही. मोदी, शाह, आरएसएसचे लोक ते समजू शकत नाही.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी श्रीनगरमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी काश्मीरमधल्या नागरिकांचे आभार मानले. काश्मीरच्या लोकांनी आपल्याला ग्रेनेड नाही तर प्रेम दिलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधीनी सुमारे १४६ दिवसांच्या प्रवासात ४ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. आज श्रीनगरमध्ये ही यात्रा समाप्त झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button