TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

आंतराष्ट्रीय योग दिनी इंद्रायणीनगर योग महोत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, योगासने, प्राणायाम प्रात्याक्षिके

भोसरी : भारतीय जनता पार्टी, श्री साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त भोसरीतील इंद्रायणीनगर येथे योग महोत्सव कार्यक्रम पार पडला. यामध्ये खेळाडू, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांनी सहभागी होत योगासने, प्राणायाम प्रात्याक्षिके केली. तसेच, योग साधनेचे महत्त्व समजून घेतले.

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 या उपक्रमाअंतर्गंत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा योग महोत्सव घेण्यात आला. परमपूज्य रामदेव महाराज पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या तत्त्वानुसार पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने हा योग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडिगेरी यांनी योगा प्रात्याक्षिके करत सहभाग घेतला. योगासने, प्राणायामाची प्रात्याक्षिक योग शिक्षक डॉ. नारायण हुले यांनी करून घेतली.

तसेच योगाचा इतिहास प्रचार प्रसार सुंदर माहिती दिली व उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले. प्रात्यक्षिक योग शिक्षक पांडुरंग चव्हाण संगीता जाधव रोहिणी फरताळे या सर्वांनी करून दाखविला. विलास मडिगेरी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योग व आयुर्वेद याचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करून दिले आहे. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरेत योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेवणे शक्य आहे. तन व मनाचा एकत्रित व्यायाम योगसाधना घडवून आणते. त्याकरिता सर्वांनी सातत्याने योगसाधना करणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात या योग महोत्सवाच्या माध्यमातून असंख्य नागरिकांनी बर्गाच्च उपस्थित लावली कार्यक्रमाचे आभार पांडुरंग चव्हाण मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button