breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘पंतप्रधान मोदी हे गौतम अदाणींसाठी कायदे आणत आहेत’; राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वर्ष २०१६ मध्ये नोटबंदी झाली. पण तेव्हापासून अजूनही त्याविषयीच्या चर्चांना काही विराम मिळाला नाही. दरम्यान यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी करतो, देशातला काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा संपला का? तर मुळीच नाही उलट वाढला आहे. मग सांगितलं की जीएसटी आणतो त्याने फायदा होईल कुणाचा फायदा झाला? असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदी केली की काळा पैसा बाहेर येईल आणि संपुष्टात येईल. काळा पैसा मिटला का? उलट वाढला. त्यांनी म्हटलं होतं GST आणतो, देशाची प्रगती होईल. जीएसटीचा कुणाला फायदा झाला का? उलट महागाई वाढली. काँग्रेसच्या कार्यकाळात ४०० रुपयांचा सिलिंडर मिळत होता आज किंमत किती झाली? १२०० रुपये.

हेही वाचा – कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नोंदी शोधणार; केली नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

Video : 

नरेंद्र मोदी म्हणाले होते १५ लाख रुपये प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये जमा होतील. शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदे गौतम अदाणींसाठी आणत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.

गौतम अदाणींना खाणी दिल्या जातात, जंगलं दिली जातात. पाणी, जमीन सगळं तुमच्याकडून हिरावून अदाणींना दिलं जातं आहे. भाजपाचे लोक आले की ते फक्त एकच गोष्ट करतात खोटी आश्वासनं देणं. आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिलिंडरवर ५०० रुपयांची सबसिडी देऊ. बेरोजगार, मजूर, गरीब लोकांच्या खिशात पैसे कसे जातील आम्ही पाहू. मोदींना तसं वाटत नाही, त्यांना वाटतं सगळा पैसा अदाणींच्या खिशात जावा. शेतकरी, गरीब, छोटे दुकानदार, मजूर यांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत यासाठी काँग्रेस प्रयत्न करतं आहे यापुढेही करणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button