ताज्या घडामोडीपुणे

खंडणी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने हल्ला

भांबोली येथील घटना ; सहा जणांना अटक

पुणे | खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने एकावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. महाळुंगे इंगळे पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी ( दि. १८ ऑगस्ट ) सहा खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.चाकण औद्योगिक क्षेत्रातील भांबोली गावच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, दरोडेखोरांनी या हल्ल्यानंतर जखमीचे सोन्याचे दागिने लुटल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी यावेळी हल्लेखोरां कडून गुन्ह्यात वापरलेले तीन लोखंडी कोयते, चार लाकडी दांडकी व तीन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.अक्षय किसन कोळेकर ( वय – २४, रा. भांबोली, ता. खेड ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. कोळेकर यांच्या फिर्यादी वरून आकाश बाळासाहेब शेळके ( वय – २५, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ), गणेश बबन डांगले ( वय – २०, रा. गवारवाडी, पाईट, ता. खेड,), नारायण सुनील घावटे ( वय – २१, रा. शेलू, ता. खेड ), गणेश हिरामन लिंभोरे ( वय – २०, रा. शेलू, ता. खेड,), विठ्ठल नवनाथ पिकळे ( वय – २१, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ) व साईनाथ रामनाथ राऊत ( वय – ३०, रा. भांबोली, ता. खेड ) यांना अटक करण्यात आली आहे.

तर या घटने नंतर गायब झालेल्या संतोष मधुकर मांजरे ( रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ), प्रदीप अरुण पडवळ ( रा. बोरदरा, आंबेठाण, ता. खेड,) सुमित भोकसे ( रा. कुरकुंडी, ता. खेड,) व अन्य एकजण आदींचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, भांबोली येथे रविवारी ( दि. ८ ) रात्रीं आठ वाजण्याच्या फिर्यादी अक्षय किसन कोळेकर यांच्या पानटपरीवर येऊन सदर पानटपरी चालू ठेवायची असेल तर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता दे, अशा खंडणीची मागणी फिर्यादी कोळेकर यांच्याकडे सराईत गुन्हेगार संतोष मधुकर मांजरे याने केली.परंतु अक्षय कोळेकर याने संतोष मांजरे यास हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याने त्याचे इतर नऊ ते दहा साथीदारांसह येवून फिर्यादी अक्षय कोळेकर व त्याचे मित्र जीवन मधुकर पवार, सचिन ज्ञानदेव बोत्रे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी कोयेते, लाकडी दांडक्याने डोक्यात, हातापायावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

तसेच जीवन मधुकर पवार यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, सचिन ज्ञानदेव बोत्रे याच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन असा साठ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने दरोडा घालून लुटला.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळचे मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार आदीच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button