एसटी बसचे लोकेशन घरबसल्या समजणार

पुणे : एसटीने बाहेरगावी जाताना प्रवाशांची होणारी धावपळ आता कमी होणार. ज्या एसटीने बाहेरगावी जायचे, ती एसटी बस सध्या कुठे, किती वाजता स्थानकावर येणार किंवा स्थानकावरून निघणार हे प्रवाशांना घरबसल्या समजू शकणार आहे. त्यामुळे तासंतास स्थानकावर ताटकळ बसणे किंवा धावपळ करीत स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाने सर्व नव्या बसेस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसविण्यात आली आहे. मात्र, त्याला जीपीएस यंत्रणेला जोडलेले नव्हते. त्यामुळे बसचे लाइव्ह लोकेशन समजत नव्हते. मात्र, आता पुणे विभागातील १४ आगारांतील ७५० बसेसना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागणार. सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
एसटीचे वेळापत्रक सुधारावे व बसेसची सद्य:स्थिती प्रवाशांना कळावी, यासाठी व्हीटीएस प्रणाली महत्त्वपूर्ण आहे. अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी, यासाठीही या यंत्रणेचा लाभ होतो. आता, जीपीएस जोडण्यात आल्याने प्रवाशांसह एसटी प्रशासनाहे बसचे लाइव्ह लोकेशन कळणार असल्याने त्यानुसार पुढील फेरीचे काटेकोर नियोजन करता येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पुणे विभागात गेल्या तीन वर्षांपासून व्हीटीएस प्रणाली सुरू आहे. आता, जीपीएस यंत्रणा बसल्यामुळे बसचे लोकेशन प्रवाशांना कळते. त्याचा वापरही अनेक प्रवासी करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून, धावपळही कमी होईल. आम्हालाही पुढील बसचे नियोजन करणे शक्य होईल.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी