ताज्या घडामोडीपुणे

पोलीस आयुक्तालयासमोर आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस निलंबित

पुणे | पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळे यांच्या मृत्यूप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याला जबाबदार धरत निलंबित करण्यात आले. विद्या पोखरकर असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांची नाव आहे. खडकी पोलिस ठाण्यात त्या चारित्र पडताळणीचे काम करतात.पुणे पोलीस आयुक्तालय समोर बुधवारी सुरेश पिंगळे या व्यक्तीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गंभीररीत्या भाजलेल्या पिंगळे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. सुरूवातीला पोलिसांच्या हलगर्जीपणा ला कंटाळून सुरज पिंगळे यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पिंगळे यांच्या पिशवीत सापडलेल्या चिट्ठी नुसार त्यांनी कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या केली अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पिंगळे यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी त्यांच्या जवळ असणाऱ्या पिशवीत पोलिसांना आठ पानांची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत कौटुंबिक समस्या आणि इतर पंधरा कारणे दिली आहेत असा दावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला आहे. त्यात पोलीसांच्या चारित्र्यपडताळणी लवकर न मिळाल्याचे एक कारण आहे. सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्याबाबतची चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान नोकरीच्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र दाखल करायचे होते त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरेश पिंगळे हे पोलीस आयुक्त कार्यालयात चकरा मारत होते. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. पडताळणीत त्यांच्या नावाचे साम्य असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवर कोथरूड, समर्थ व सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. नावसाध्यर्मामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button