ताज्या घडामोडीपुणे

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने घेतला गळफास

पुणे | पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने टिंगरेनगर, विश्रांतवाडी येथे बुधवारी (दि. 18) सकाळी सात वाजतेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. विमल साळवे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.रमेश मेढे (वय 65, रा. आळंदी रोड, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढे हे आत्महत्या केलेल्या महिलेचे वडील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शिवीगाळ केली आहे. मागील काही महिन्यांपासून आरोपी घरामध्ये राशन, भाजीपाला आणून देत नसे. तसेच दुसऱ्या महिलेच्या सांगण्यावरून तिला उपाशी ठेवून असे. त्यामुळे पीडीत महिलेने नोकरी करण्याचा निर्णय घेतला असता, त्यालाही विरोध केला. पतीच्या त्रासला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. विश्रांतवाडी पोलीस तपास करत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button