चहा पिताना मस्करी दोघा भावांच्या जीवावर बेतली, पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढताना पहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातल्या धनकवडी परिसरात चहा पिताना झालेल्या मस्करीतून झालेल्या वादातून दोघा भावांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यात चहा पित असताना मस्करीतून झालेल्या वादातून दोघा भावांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून ४ ते ५ जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. मंगळवारी ९.३० वाजता हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा – मान्सूनचे अंदाज चुकला, स्कायमेटने दिली चिंता वाढवणारी बातमी
https://twitter.com/ThePuneMirror/status/1668942294911709186
ऋषि बर्डे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कैद झाला आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी सिध्देश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.