ताज्या घडामोडीपुणे

विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रमुख अतिथींच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले

चाकण : श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिन सोहळ्याला मा. श्री नायब सुभेदार साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्याचबरोबर माननीय श्री. वैभव निकम व मा. श्री. विनायक म्हसे या मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय होती.

प्रमुख अतिथींच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. विद्याव्हॅली व विद्यानिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजास व प्रमुख पाहुणे व मान्यवरांस मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिन सोहळ्यास संस्थेचे संस्थापक मा. श्री साहेबराव देशमुख, सौ. सुमन ताई देशमुख, संस्थेची अध्यक्ष शामराव देशमुख ,कार्यकारी अध्यक्षा सौ. रोहिणी ताई देशमुख, उपाध्यक्ष श्री अक्षयराजे देशमुख व संचालिका हर्षल ताई देशमुख व मा. श्री.डी.पी सोनवणे आवर्जून उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय सौ. मोनाली नलावडे यांनी केला व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत ‘ या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य व गीतांचे सादरीकरण केले. या कलागुण दर्शनासाठी नृत्य शिक्षिका सौ. पुनम व सौ. श्रीमोहंती तसेच. संगीत शिक्षिका सौं.नयन बाळसराफ यांचे मार्गदर्शन लाभले. विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षकांनी जयोस्तुते या देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वामी याने सौ. हर्षा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी सावरकर बोलतोय ‘ हे एकपात्री नाट्य सादर केले.

सौ. माधुरी घोडेकर यांनी स्वातंत्र्यवीरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शामराव देशमुख सर यांनी कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले. याशिवाय शाळेत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सूप्त गुणांना कसा वाव दिला जातो व त्यामध्ये संस्थेचे योगदान याविषयी माहिती दिली.
श्री नायब सुभेदार यांनी विविध कलागुण दर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व. देशाच्या विकासात नवीन पिढीचे योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. मा. श्री. विनायक म्हसे यांनी तिरंग्यात लपेटून घरी परतलेल्या देशभक्ताच्या लहान मुलाच्या मनातील भावना दर्शविणाऱ्या हृदयस्पर्शी गीताचे सादरीकरण केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती रणदिवे व प्राचार्य दीपक शिंदे सर व सर्व क्रीडा शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी व जर्मन या चार भाषांमध्ये केले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व वंदे मातरमने झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button