गाझामध्ये 10 महिन्यांच्या मुलामध्ये पोलिओचा पहिला रुग्ण आढळला
युद्धग्रस्त गाझामध्ये वर्षांनंतर पोलिओचा पहिला रुग्ण, पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
पॅलेस्टाईनः गेल्या महिन्यात गाझामधील दोन प्रमुख शहरांच्या सांडपाण्यात पोलिओचे विषाणू आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या २५ वर्षांपासून हा परिसर पोलिओमुक्त आहे. युद्धग्रस्त गाझामध्ये वर्षांनंतर पोलिओचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. देर अल-बालाह शहरातील एका 10 महिन्यांच्या मुलामध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मुलामध्ये पोलिओची लक्षणे दिसल्यानंतर तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये संसर्गाची पुष्टी झाली. या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचा एकही डोस मिळालेला नव्हता. हा संसर्ग साधारणपणे पाच वर्षांखालील मुलांमध्ये होतो आणि तो दूषित पाण्याद्वारे पसरतो.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे असे देश आहेत जिथे पोलिओचा संसर्ग कधीच थांबलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स एजन्सी (युनिसेफ) ने इस्रायल आणि हमासला सात दिवस युद्ध थांबवण्यास सांगितले आहे, जेणेकरून 6,40,000 पॅलेस्टिनी मुलांना पोलिओची लसीकरण करता येईल.
गेल्या महिन्यात गाझामधील दोन प्रमुख शहरांच्या सांडपाण्यात पोलिओचे विषाणू आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या २५ वर्षांपासून हा परिसर पोलिओमुक्त आहे.





