Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीने नाही’; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

धुळे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीने नाही,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

‘अदृश्य शक्ती देश चालवू शकणार नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीने नाही. सरकार स्थापनेसाठी यांनी घर, पक्ष फोडला. अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह काढून नाही तर ओरबाडून घेतलं. इडी, सीबीआयचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचं काम या सरकारने केलं.’ अशी जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली आहे.

हेही वाचा –  अमित शाहांनी जाहीर केला पुढच्या ३५ वर्षांचा प्लॅन; पक्षाला धक्काही लागणार नाही अशी रणनीती

प्रेमाने, सन्मानाने, संविधानाने जर त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. जर त्यांनी संविधानाची चौकट ओलांडून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ही दडपशाही सहन करणार नाही असा इशारादेखील सुप्रिया सुळेंनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button