केंद्रीय मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर, शहरातील वाहतूक बदलाबाबतचे आदेश जारी….

पुणे : अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा व भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत ४ जुलै २०२५ रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
बंडगार्डन वाहतुक विभागाअंतर्गत मोर ओढा ते सर्किट हाऊस चौक ते आय.बी. चौक दरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतुक करण्यात येत आहे. तसेच काळेपडळ, कोंढवा व भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक ते कात्रज चौक दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व माल वाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड, अवजड व धीम्या गतीने चालणाऱ्या (स्लो मुव्हिंग) वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे, असे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त हिंमत जाधव यांनी जारी केले आहेत.
हेही वाचा – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात शरद पवार जाणार नाहीत, कारण सांगत म्हणाले; “मी…”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सायंकाळी पुण्यात येत आहेत.आज ते पुण्यातच मुक्कामी राहणार असून उद्या (४ जुलै) पुण्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत.एनडीएमधील बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरणासह इतरही कार्यक्रमांना ते शुक्रवारी उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता ४ जुलै २०२५ रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.