‘स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार’; मंत्री उदय सामंत यांची माहिती
![Uday Samant said that the proposal of Swargate-Katraj Metro will be sent to the Centre](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Uday-Samant--780x470.jpg)
नागपूर : पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य भीमराव तापकीर यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
हेही वाचा – ‘इस्त्रायलमधून EVM हॅकिंगचं तंत्र भारतात आणलं’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खडारी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.