TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू

पुणे : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागातील पाऊस कमी झाला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे.

केरळ आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थिती आहे. केरळपासून मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक पार करून पुढे गेला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १२ ऑक्टोबरपर्यत पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वच भागात मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आता हा पाऊस कमी होत चालला असून विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यातील पाऊस कमी झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button