Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लाडक्या लेकींना सरकारची पहिली भेट!

पुणे : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुली शिकल्या पाहिजे यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. त्‍यासाठी ५ हजार ४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व मुलींच्‍या बँक खात्‍यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, यासाठी राज्‍य शासनाच्‍या महिला व बालकल्याण विभागामार्फत लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत मुलींना एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्‍य शासनाने एप्रिलमध्ये ही योजना सुरू केली. त्या योजनेला लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातून ७ हजार ३९२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५ हजार ४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्या मंजूर अर्जदार मुलींच्या बँक खात्यात जन्मलेल्यानंतरचा पहिला पाच हजार रुपयांचा हफ्ता वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा – To The Point : शिरुरचे खासदार अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आता मतदार संघात ‘मिस्टर इंडिया’च्या भूमिकेत!

दरम्‍यान, मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे. जन्मतः पाच हजार रुपये रकमेचा पहिला हफ्ता दिला जाईल. त्यानंतर पहिलीत सहा हजार रुपयांचा दुसरा हफ्ता, सहावीत सात हजार रुपये, अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण होताच ७५ हजार रुपयांचा शेवटचा हफ्ता दिला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांचे उत्पन्न एक लाखचे असावे, भविष्यात दोन अपत्त्यांवर प्रतिबंध केलेले असावे, तसेच अधिवास असल्याचा दाखला आणि मुलीसह संयुक्त पासबुक असावे अशा योजनेच्या अटी आहेत, अशी माहिती महिला व बालकल्‍याण विभागाकडून देण्यात आली.

लेक लाडकी योजनेंतर्गत ५ हजार ४०० पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्‍ता देण्यात आला आहे. मात्र, अजूनही १ हजार ९९२ अर्ज प्रलंबित आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी असून, त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारांना करण्यात आल्या आहेत. अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button