Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॅा. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Dr. vijay kelkar :  २०२५ चा पुण्यभूषण पुरस्कार डॅा. विजय केळकर यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या अर्थक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॅा. सतीश देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

यंदाचे पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याचे हे ३७ वे वर्ष असून मोठ्या दिमाखदार पद्धतीने पुण्यभूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच या सोहळ्यात कर्तव्य बजावत असलेल्या जखमी झालेल्या चार वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव करण्यात येणार आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रूपये रोख रकमेची थैली असे स्वरुप या पुस्काराचे असणार आहे.

हेही वाचा –  महावितरण समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘‘साकडे’’

पुण्यभूषण पुरस्कारार्थीचे नावे

मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी,  शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ महेश एलकुंचवार, विकास आमटे, आशा भोसले,  शरद यादव,  नितीन गडकरी,  पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा,  प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, पद्मविभूषण नारायण मूर्ती आदी मान्यवरांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button