सद्रक्षणाय खलनिग्रहणाय; राज्यातील 43 पोलीस अधिकारी ठरले राष्ट्रपती पदकाचे मानकरी

पुणेः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंद्धेला देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर आता राज्यातील पोलीस दलात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. देशभरातील ६३४ पोलिसांना शनिवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलीस दलात उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ४३ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. तसेच चार पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी ही पदके जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये राज्यातील नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे, महानिरीक्षक दत्ता कराळे, वीरेंद्र मिश्रा, सहायक आयुक्त अरुण डुंबरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष सेवेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. तसेच कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रक्षिशण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे यांना देखील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
कारागृहातील दक्षता विभागात कार्यरत असणारे उपधीक्षक सुनील तांबे हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर पोलीस दलात रूजू झाले. त्यांच्या ३६ वर्षांच्या सेवेत त्यांना ४०० हून अधिक बक्षिसे मिळालेली आहेत. दिवे आगर येथील गणेश मूर्तींच्य दागीने चोरीचा शोध लावल्याबद्दल तत्कालीन गृहमंत्री आर. आर पाटील यांच्या हस्ते १० लाख रुपयांचे बक्षीस त्यांच्या पथकाला मिळाले होते. तसेच गुन्हे शाखेत सहायक आयुक्तपदावर असताना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. त्यावेळी तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतूक करुन २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेतील तत्कालिन सहायक आयुक्त सुनील तांबे आणि त्यांच्या पथकाने केला होता.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





