Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘वेल्हे’ नव्हे आता ‘राजगड’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी

पुणे | स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचं नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे या गावाचं नाव बदलून ते राजगड असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. आता राज्य सरकार लवकरच राजपत्र प्रसिद्ध करणार आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे त्यामुळे या तालुक्याचे नाव राजगड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. वेल्हे तालुक्यातील ५८ ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेने तालुक्याच्या नावात बदल करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावाला महसूल विभागानेही मंजुरी दिली.

हेही वाचा     :      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण 

वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांकडून तालुक्याचं नाव बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ रोजी प्रस्ताव तयार करून घेण्यात आला होता. यानंतर पुढील टप्प्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्याच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता वेल्हे तालु्क्याच्या राजगड या नावाला केंद्र सरकारनेही मंजुरी दिली आहे. यानंतर आता राज्य सरकार राजपत्र प्रसिद्ध करणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button