ताज्या घडामोडीपुणे

राज ठाकरेंना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका

पुण्यातल्या वाहतूक कोंडीत, 25 मिनिटे गाडी फडके चौकात

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडीचा केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर राजकीय नेत्यांना देखील फटका बसत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांच्या ताफ्यालादेखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राज ठाकरे आज पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या फडके हौद चौकात मनसे कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मूर्ती तुमची किंमतही तुमचीच या कार्यक्रमासाठी आले असता राज ठाकरेंना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळालाय.

हेही वाचा  :  स्वतंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयासाठी पाठपुरावा

शनिवार असल्याने पुणे शहरातील पेठांमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळे या सर्व भागात मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. तब्बल 25 मिनिटे राज ठाकरे या वाहतूक कोंडीत अडकून होते. राज ठाकरे स्वतः नेहमीच मुंबई आणि पुण्यातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर भाष्य करत असतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांनाच या समस्यांचा अनुभव आल्याने सामान्य पुणेकरांच्या नाराजीला अधिक बळ मिळाले आहे.

या घटनेनंतर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प, मेट्रोचे काम आणि सातत्याने सुरू असलेले रस्त्यांवरील खड्डे यामुळे शहरातील वाहतूक कोंडी अधिक गंभीर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुण्याच्या वाहतूक कोंडीच्याया समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button