Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

MSDP अंतर्गत महिलांसाठी कृषी, अन्नप्रक्रिया विशेष प्रशिक्षण उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संकल्प: माजी नगरसेवक शांतराम बापू भालेकर यांचा पुढाकार !

पिंपरी-चिंचवड: भारतीय उद्यमिता विकास संस्था (EDII), अ‍ॅक्सेंचर आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रो स्किलप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSDP) अंतर्गत कृषी, बाजारपेठ व अन्नप्रक्रिया उत्पादनांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम रुपी नगर, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला.

प्रशिक्षणाचा समारोप ७ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. या वेळी माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर, EDII चे मॅनेजर भगवान हरकळ, माविमच्या एरिया को-ऑर्डिनेटर ज्योती हेलवे, तसेच मास्टर ट्रेनर अमृता गोडसे यांच्या उपस्थितीत सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबन, उद्यमशीलता व स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीकडे प्रवृत्त करणे असा होता. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, विपणन कौशल्य, गुणवत्ता नियंत्रण, तसेच आधुनिक अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा –  ‘एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

प्रशिक्षणादरम्यान महिलांनी विविध उद्योजकीय कल्पना मांडल्या असून, स्वतःची उत्पादने बाजारात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अखेरीस मान्यवरांनी सहभागी महिलांचे विशेष कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल उद्योजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“महिलांना उद्यमशीलतेच्या प्रवासात सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षणांमुळे त्या आत्मविश्वासाने पुढे येतात, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलतात.”अशा प्रकारचे प्रशिक्षण महिलांच्या आत्मविश्वासात भर घालतात, त्यांचे जीवनमान उंचावतात व समाजात त्यांचा सक्रीय सहभाग वाढवतात.” तसेच त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे, स्थानिक संसाधनांचा वापर व विपणनाच्या संधींचा योग्य वापर करावा.

– शांताराम बापू भालेकर, माजी नगरसेवक.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button