Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महानगरपालिकेच्या फटाका स्टॉल लिलावातून तब्बल ८३ लाखांचा महसूल

पुणे | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाही फटाक्यांच्या स्टॉल्सचा ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता. या लिलाव प्रक्रियेतून महापालिकेला तब्बल ८३ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एकूण १९२ स्टॉल्सपैकी १२५ स्टॉल्सचा यशस्वी लिलाव झाला असून ६७ स्टॉल्स विक्रीअभावी राहिले. शहरातील १३ ठिकाणी ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया राबवण्यात आली.

शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील नदीकाठावरील स्टॉल्सना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी ४० स्टॉल्ससाठी बोली लावण्यात आली, ज्यापैकी सर्वाधिक बोली ६९ लाख रुपये इतकी होती.

हेही वाचा     :          पूरग्रस्त बाळेवाडी, भालेवाडी आणि पोटेगाव ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू फुलले! 

लिलाव झालेल्या ठिकाणांमध्ये शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र), हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर (सीझन मॉल), वारजे (आरएमडी कॉलेज) आणि लोहेगाव या भागांचा समावेश आहे.

महानगरपालिकेने २०२३ पासून फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी ऑनलाइन लिलाव प्रणाली सुरू केली असून ही पद्धत प्रशासनासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदाचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असून, व्यापाऱ्यांकडूनही या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button