नायडू रुग्णालयात 350 बेड, परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग
पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट

पुणेः चीनमध्ये एचएमव्हीपी या विषाणुने डोकं वर काढले असून त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या माध्यमांतून समोर येत आहे. यानंतर बंगळूरमध्येही लहान बाळाला या विषाणुची लागण झाली असून नागपूरातही या विषाणुच्या दोन केसेस समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. महापालिकेच्या वतीने त्या दृष्टीने तयारी देखील केली असल्याची माहिती मिळत आहे. नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.
हेही वाचा – पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
चीनमध्ये या विषाणुने डोकं वर काढल्यानंतर बंगळुरमध्ये या विषाणुची केस आढळली. त्यानंतर नागपूरातही केस आढळली आहे. यामुळे आता आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे. राज्य सरकारने यासंबंधीची बैठक घेत नियमावली तयार केली आहे. या नियमांच्यानुसारच आरोग्य विभागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाला काम करावे लागणार आहे. हे आदेश पाळण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.





