Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाला वेग; ५ नव्या मार्गांसाठी राज्य सरकारची मंजुरी – गणेशोत्सवात पुणेकरांना मोठी भेट

शहरातील वाहतूककोंडी आणि प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकल्प

📍 मुख्य मुद्दे:

  • राज्य सरकारची ५ मेट्रो मार्ग व २ नवीन स्थानकांना हिरवा झेंडा

  • तब्बल १८,००० कोटींपेक्षा अधिक खर्च

  • प्रकल्प केंद्र सरकारकडे सादर; लवकरच निविदा प्रक्रिया

पुणे :  पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रो च्या विस्ताराच्या रूपाने गणेशोत्सवात खास भेट मिळाली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या ५ नव्या मेट्रो मार्गांच्या विस्तार व दोन स्थानकांच्या उभारणीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या विकासाला नवा गती मिळणार असून, शहरातील वाहतूककोंडी आणि प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.

प्रक्रिया काय पुढे?

राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी बाह्य सहाय्यित कर्जाच्या आकस्मिक दायित्वास मान्यता दिली आहे. यानंतर प्रकल्प केंद्र सरकारकडे सादर केला जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया सुरू होईल. यामुळे पुण्यात मेट्रोच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे.


मेट्रो मुळे शहराच्या विकासाला चालना

या विस्तारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो जाळे आणखी मजबूत होणार असून, दैनंदिन प्रवास जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक होईल. विशेषतः कात्रज, वाघोली, खराडी, निगडीसारख्या क्षेत्रांना मेट्रोने जोडल्याने नवीन विकासाच्या संधी खुल्या होतील आणि नागरिकांचा प्रवाससुद्धा सुकर होईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button