पुण्याला मिळाल्या नव्या ४० बस; प्रवाशांना मिळणार अधिक सोयीसुविधा

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) नव्याने खरेदी केलेल्या ४० बस पुणे विभागाला मिळाल्या आहेत. या बसमुळे प्रवाशांना उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अधिक सोयीसुविधा मिळणार आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या चार विभागांना प्रत्येकी १० एसटी बस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
पुणे विभागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने बसची कमतरता जाणवत होती. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी आणि जुन्या बसमुळे वाढलेल्या बिघाडाच्या समस्या आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या या नव्या बस दाखल झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असून उन्हाळी सुट्टीच्या हंगामात वाढणाऱ्या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
हेही वाचा – ‘ओला-उबेरला “आमचा ऑटोचा, पर्याय’; बाबा कांबळे
यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी आणि जुन्या बसमुळे वाढलेल्या बिघाडाच्या समस्या आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या या नव्या बस दाखल झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असून उन्हाळी सुट्टीच्या हंगामात वाढणाऱ्या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
पुणे विभागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने बस संख्या कमी आहे. त्यामुळे काही वेळा संचलनाचे नियोजन करताना अडचणी येत होत्या. तसेच सर्व गाड्या जुन्या झाल्यामुळे रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत एसटी महामंडळ पुणे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले की, सध्या पुणे विभागात नव्याने ४० बस दाखल झाल्या आहेत. यामधून स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती आणि इंदापूर या चार आगारांना प्रत्येकी दहा बस देण्यात आल्या आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.