Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
पुणे: परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तर प्रदेशात,अन् चीनमध्येही!
पुणे – राज्यातील आरोग्य सेवक भरतीसाठी एका परीक्षार्थीचे लेखी परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशात, तर एकाचे केंद्र चक्क चीनमधील उहान प्रांतात देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ पदभरतीसाठी शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. तब्बल आठ लाख ६६ हजार परीक्षार्थी असलेल्या या परीक्षेकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहिले आहे, असे तक्रारींवरून दिसत नाही.
दत्ता पातूरकर या उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर चक्क उत्तर प्रदेशातील ‘नोएडाचे सेक्टर ५५’मधील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विशाल ढवळे या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर ४१४३१२ ४१३५१२ हा चीनच्या उहान प्रांतातील पिन कोड देण्यात आला आहे.





