प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीने पाठवले पुन्हा समन्स
शिकोहपूर जमीनप्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर

पुणे : काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पु्न्हा समन्स पाठवले आहे. यापूर्वी वाड्रा यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होता. त्यानंतर त्यांना आज, 15 एप्रिल रोजी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. शिकोहपूर जमीनप्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – प्रवाशांना वातानूकुलीत पर्यटनाची संधी, पीएमपीकडून उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांसाठी खास बससेवा
केंद्रीय तपास यंत्रणेने गेल्या वर्षी मनी लाऊंड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांनी यापूर्वी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते. पण ते त्यावेळी हजर झाले नाही. त्यामुळे ईडीने त्यांना आज कार्यालयात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठवले. आज वाड्रा हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.