Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रूग्णालयातील दोषींवर कारवाई करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे धर्मादाय आयुक्तांना आदेश

पिंपरी : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.

गरोदर महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु आधी २० लाख भरा तरच अँडमीट करू असे सांगितले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी  ९ ते दु.२ पर्यंत मदतीसाठी वाट बघून शेवटी वाट पाहून दिनानाथ हाँस्पीटल मधून तिला ससून येथे नेण्यात आले. तिथे भिषण परिस्थिती बघून शेवटी वाकड सुर्या हाँस्पीटल येथे प्रसुतीसाठी नेण्यात आले तिथं महिलेची प्रसुती झाली परंतु अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिचा म्रुत्यु झाला.

सुशांत भिसे यांच्याकडे २० लाख रू ची मागणी करुन १० लाख भरायला सांगितले. पुढच्या दोन तासात गावाकडची शेती विकून पैसे भरतो.. पण अँडमीट करून घ्या.. अशी विनंती सुशांत करत होता. पण रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी नकार दिला. यासर्वात  गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला.

हेही वाचा –  रूग्णालयातील दोषींवर कारवाई करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोनांदेडमध्ये भीषण अपघात : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यूडेंचे धर्मादाय आयुक्तांना आदेश

दरम्यान या घटनेची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी धर्मादाय आयुक्तांना आदेश कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल घडलेली जी घटना आहे ती फार दुर्दैवी आहे. पैशांच्या अभावी रूग्णाची डॉक्टरांनी काळजी न घेतल्याने, त्यांच्या निष्काळजीपणामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला असं तिच्या कुटूंबाचं म्हणण आहे.

मी धर्मादाय आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. असा मी आदेश देणार आहे. काल घडलेली जी घटना आहे तशी घटना संपूर्ण महाराष्ट्रमध्ये घडू नये, आमदार गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाची ती पत्नी होती, त्यांच्या दुर्दैवी जाण्याने या गोष्टीवर प्रकाश पडला.

यापूर्वी अशा घडना घडल्या असतील, मात्र, अशा घटना घडू नये यासाठी  मुंबईत गेल्यावरती एक बैठक घेणार आहे, अशा घटना टाळण्यासाठी यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button