पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा सत्कार
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात पीएमआरडीए तिसऱ्या स्थानावर

पिंपरी | महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या मूल्यमापनात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राज्यातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय, निमशासकीय संस्थांमधून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले. याबद्दल महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा दिनेश ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे प्रोप्रायटर दिनेश लिंगावत, व वृक्ष प्राधिकरण सदस्य सुरेश वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्यांवर भर देण्यात आला आहे. याच मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. या कार्यक्रमात शासनाच्या सर्व 95 महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केली मात्र या 100 दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम 5 महामंडळांची निवड झाली. ज्यामध्ये पीएमआरडीएला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहेत.
हेही वाचा : ‘वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नाही’; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया