Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना जरब

पुणे :  पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील रस्ते अपघातांत मोठी घट झाली आहे. शहरात २०२३ मध्ये ३३४ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर २०२४ मध्ये ३१० अपघाती मृत्यू झाले.

पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने रस्ते सुधारणा आणि वाहतूक नियोजनासाठी विविध प्रयत्न केले आहेत. यामध्ये रस्त्यावरील अडथळे हटविण्याबरोबरच रस्त्याचा दर्जा सुधारणे, खड्डे बुजवणे, पट्टे आखणे आदी सुधारणा केल्या. याबरोबरच सातत्याने केलेल्या ड्रंग ॲण्ड ड्राइव्ह कारवाया, राँग साइड आणि ट्रीपल सीट वाहनचालकांवर कारवाई केल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले.

हेही वाचा  :  दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नियमभंग मोडणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओला प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चांगलीच जरब बसली आहे. त्यानुसार आरटीओने १३४५ परवाने रद्द केले आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या मदतीने अपघातचे ब्लॅकस्पॉट ६० वरून ३६ इतके कमी करण्यात यश आले आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या शहरात मध्यंतरी पब आणि रेस्टॉरंट बारचालकांनी नियमांची पायमल्ली करत चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यांनी पहाटेपर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्याने तरुणाई त्याच्या आहारी गेल्याचे चित्र होते. यामुळे अपघातांची संख्याही वाढत होती. दुसरीकडे अंमली पदार्थ तस्करही सक्रीय झाले होते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार चालकांवर शिस्तीचा चांगलाच बडगा उगारला. नियम मोडणाऱ्यांवर कोयतीही हयगय न करता कारवाई होत आहे. हे पब आणि बार बड्या धनिक आणि राजकीय वरदस्त असलेल्या लोकांचे आहेत. मात्र, तरीदेखील पोलीस आयुक्तांनी दबावापुढे न झुकता पब आणि बारचालकांना चाप लावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button