Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत, ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवण्याची संधी

पुणे :  ‘घरगुती ग्राहकांचे वीज देयक शून्यवत करणाऱ्या पीएम सूर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (मास्मा) यांच्या वतीने बनविण्यात आलेल्या सौररथाचे उद््घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोहोळ यांनी हे आवाहन केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजिनदार समीर गांधी उपस्थित होते.

हेही वाचा –  मला बीडचं पालकत्व मिळालं असतं, तर..; पंकजा मुंडे यांचं विधान

घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत आहे. घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॉटसाठी ३० हजार, दोन किलोवॉटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक उपयोगासाठी ५०० किलोवॉटपर्यंत प्रति किलोवॉट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

या योजनेचा जागर करण्यासाठी पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांनी सूत्रसंचालन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी येत्या गुरुवार(ता. २३) पर्यंत हा सौर रथ फिरणार आहे. या रथाद्वारे ‘डिजिटल स्क्रिन’च्या माध्यमातून वीज ग्राहकांशी थेट संवाद साधला जात आहे. योजनेची माहिती, फायदे, प्रतिकिलोवॉट मिळणारे अनुदान, ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक तसेच माहिती पत्रकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button