मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून पुन्हा उपोषणाचा इशारा; राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्या, ३० मे पासून पुन्हा एकदा बेमूदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. सध्या राज्यातील उन्हाची तीव्र लाट पाहता, जरांगे यांनी ‘भर उन्हात’ हे उपोषण करण्याचा आक्रमक पवित्र घेतला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले असून, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा – अमेरिका-इराण करारा दरम्यान भारतासाठी आनंदाची बातमी : तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी केली पार
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मुदती संपल्या आहेत. “सरकारने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे, अन्यथा ३० मे पासून मी पुन्हा उपोषणाला बसेल,” असा इशारा त्यांनी दिला होता. मे महिन्यातील कडक ऊन आणि जरांगे यांची खालावणारी प्रकृती लक्षात घेता, हे उपोषण रोखण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या.





