अनौपचारिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Hold-an-urgent-meeting-to-resolve-the-sugarcane-price-Farmers-organizations-demand-from-the-District-Collector-7-780x470.jpg)
पुणे : भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रगती करत आहे. मात्र, दुर्दैवाने शिक्षणाला अद्यापही प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या विविध योजना जाहीर होतात. मात्र त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, हे स्पष्ट नाही. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन नसल्याचे जाणवते. याशिवाय औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – ‘मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक’; मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त विधान, भाजपा नेते आक्रमक
विद्या महामंडळ संस्थेमार्फत पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात पार पडला. आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. वर्षा बापट यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लीलाधर गाजरे, उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गाजरे यांनी प्रास्ताविक केले. गौतम मगरे यांनी आभार मानले.