Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक’; मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त विधान, भाजपा नेते आक्रमक

Mallikarjun Kharge | काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. मी हिंदू आहे, माझे नाव मल्लिकार्जुन खरगे आहे, मी लिंग आहे, १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. माझ्या वडिलांनी माझे असे नाव ठेवले आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्याने तीव्र निषेध केला आहे.

भाजपा नेते शेहजार पूनावाला यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. ते म्हणाले, हिंदू धर्माचा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाची ओळख आहे. काँग्रेसने आधी श्रीरामाचा अपमान केला. काँग्रेसने श्री राम लला यांच्या अभिषेकासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नृत्य आणि गाणे म्हटले होते. काँग्रेसवाले श्रीरामाच्या अस्तित्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भगवान शिवाचा अपमान करत आहेत. खर्गे यांनी स्वतःची तुलना १२ ज्योतिर्लिंगांशी केली आहे.

हेही वाचा     –      लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? भाजपाने मांडली भूमिका

मला विचारायचे आहे की काँग्रेस इतर कोणत्याही धर्माबद्दल अशी टिप्पणी करू शकते का? व्होटबँकेसाठी काँग्रेसची पातळी इतकी घसरली आहे की, हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचे काम सातत्याने केले जात आहे. काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी. जर नाव शिव असेल तर तुम्ही भगवान शिव होऊ शकत नाही. कोट्यवधी लोकांची ज्योतिर्लिंगावर श्रद्धा आहे आणि हे स्वतःला ज्योतिर्लिंग म्हणवून घेत आहेत. हा हिंदू समाजाचा मोठा अपमान आहे, असं शेहजार पूनावाला म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button