ताज्या घडामोडीपुणे

नेल कटरच्या शेवटी छिद्र (होल) का असतो?

आश्चर्य वाटेल की हा होल प्रत्यक्षात खूप उपयोगी आहे. या छिद्राचा कशासाठी उपयोग होतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

पुणे : आपण सर्वचजण नखं कापण्यासाठी नेल कटरचा वापर करत असतो. या नेल कटरमध्ये एक किंवा दोन किंवा तीन वेगवेगळी ब्लेड असतात. त्याचा वापर नखं सेट करण्यासाठी किंवा नखांवरील धूळ हटवण्यासाठी केला जातो. सामान्यतः नेल कटर सहजपणे घरांमध्ये आढळतो आणि त्याचा खूप वापर केला जातो. तसेच नेल कटरखाली असलेला होल तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. हा होल बेकार समजून आपण दुर्लक्ष करत असतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की नेल कटरच्या शेवटी छिद्र (होल) का असतो? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा होल प्रत्यक्षात खूप उपयोगी आहे. या छिद्राचा कशासाठी उपयोग होतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असले तर नेल कटरमधील ब्लेड होलसह जोडलेले असतात, त्यामुळे ते फिरवण्यात, उघडण्यात आणि बंद करण्यात सोपे होते. मुख्यतः या होलचे कार्य नेल कटरला चांगली ग्रिप देणे आहे. तसेच, नेल कटरचा वापर करतांना कापलेले नख कटरच्या आत अडकू शकतात. शेवटी असलेला छेद कापलेल्या नखांना कटरच्या बाहेर येण्यासाठी मदत करतो. हा होल प्रत्यक्षात की-रिंग प्रमाणे काम करतो. तुम्ही त्याला चावीसोबत लावू शकता. त्यामुळे तुम्हाला नेट कटर सांभाळून ठेवता येईल. तो विसरला जाणार नाही किंवा हरवणार नाही. याशिवाय नेल कटर कुठेही घेऊन जाणे सोपे होईल.

हेही वाचा   :  एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तार मोडण्यामध्ये नेल कटरचा वापर
नेल कटरच्या खाली असलेला होल जरी नखं कापण्यासाठी वापरला जात नसेल, तरीही तुम्हाला सांगू इच्छितो की, नेल कटर तुमच्यासाठी घरातील कामे सोपी करण्यामध्ये उपयोगी ठरू शकतो. जर तुम्हाला अॅल्युमिनियम तार मोडण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही या होलचा उपयोग करू शकता. यासाठी तार छिद्रात अडकवून त्याला तुमच्या मनाप्रमाणे वाक देऊ शकता. त्यामुळे तारेला हवा तसा आकार येईल.

नेल कटरवरील ब्लेडचे कार्य
नेल कटरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एक किंवा दोन ब्लेड असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा वापर नखं साफ करण्यासोबत इतर अनेक कामांसाठीही केला जाऊ शकतो? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर सांगू इच्छितो की, याचा उपयोग एखादी गोष्ट कापण्यास, ड्रिलिंग करण्यास आणि बाटल्यांचे झाकण उघडण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय नेल कटरचा वापर तुम्ही मच्छर मारण्याची कॉयल लावण्यासाठी, तसेच नट-बोल्ट उघडण्यासाठी करू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button