Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुन्हा वाजणार महापालिकेचा बँड; थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्यास सुरूवात

पुणे : आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभा निवडणुकीमुळे महापालिकेच्या मिळकतकर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका प्रशासन थकबाकी वसुलीसाठी सरसावले असून, १ डिसेंबरपासून पुन्हा थकबाकीदारांच्या दारात महापालिकेचा बँड वाजणार आहे.

महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात मिळकतकर विभागास २७२८ कोटींचे उद्दिष्ट असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत १७७५ कोटींचाच कर जमा झाला आहे. त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत महापालिकेस जवळपास साडेनऊशें कोटींची वसुली करने अपेक्षित असल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून मिळकतींच्या जप्तीसह, थकबाकीदारांच्या दारत बँड वाजविण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत महापालिकेने १० मिळकती सील केल्या आहेत. महापालिकेची मिळकतकराची थकबाकी १० हजार कोटींच्यावर गेली आहे. त्यामुळे जी थकबाकी न्यायालयीन वादात नाही, ती वसूल करण्यासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत.

हेही वाचा –  Political Analysis: भोसरीत सोसायटीधारक, उच्चशिक्षित ठरले ‘‘किंगमेकर’’

याशिवाय पुढील आठवड्यापासून पाच बँड पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून शहरात बँड पथकांचा वापर केला जात असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू होते. मात्र, या वर्षी मार्च ते जूनपर्यंत शहरात लोकसभा निवडणुका असल्याने महापालिकेचे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात होते. त्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांची नियमित बदली झाली. बदली झालेले कर्मचारी रुजू झाल्यानंतर लगेचच त्यांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले. परिणामी या विभागासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने करवसुलीवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button