ताज्या घडामोडीपुणे

डासांना दूर ठेवण्याचा उपाय म्हणजे कडूलिंब किंवा निम्बाचे तेल

तुमच्या घरात डासांचा जास्त त्रास असेल तर एक नैसर्गिक उपाय खूप फायदेशीर

पुणे : डासाचा त्रास घराघरात होत असतो. डासामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार होण्याचा धोका असतो. तुमच्या घरात डासांचा जास्त त्रास असेल तर एक नैसर्गिक उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या खोलीत हा नैसर्गिक पदार्थ स्प्रे करावा लागणार आहे. त्यानंतर डास तुमच्या जवळपासही फिरकरणार नाही.

डासांना दूर ठेवण्याचा उपाय म्हणजे कडूलिंब किंवा निम्बाचे तेल आहे. कडुलिंबाचे तेल एक नैसर्गिक मॉस्किटो रिपेलेंट म्हणून काम करू करतो. डासांपासून बचाव करण्यासाठी हे प्रभावी आहे. डासांना निम्बाचा सुगंध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते तुमच्या जवळही येणार नाहीत.

कडुलिंबाच्या तेलाची फवारणी कशी करावी?
एक कप पाण्यात कडुलिंबाचे 2 ते 3 चमचे तेल टाका. त्यानंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. ते मिक्स करुन घ्या. म्हणजे तेल आणि पाणी चांगले एकजीव होईल. हे मिश्रण तुमच्या खोलीचे कोपरे, पडदे आणि फर्निचरवर स्प्रे करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही फवारणी करा. त्यानंतर डास तुमच्याजवळपास येणार नाही.

हेही वाचा   :  पुढचे ४८ तास गारपिट आणि मुसळधार पावसाचं संकट, तुमच्या जिल्ह्यात कसं राहील हवामान?

काय आहेत फायदे?
डासांसाठी कडुलिंबाचे तेल हे एक नैसर्गिक प्रभावी उपाय आहे. ते कोणत्याही रसायनावरील रेपेलेंटपेक्षा चांगले आणि सुरक्षित आहे. ते दीर्घकाळ परिणामकारक: ठकते. त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागत नाही. हा उपाय स्वस्तसुद्धा आहे.

हे सुद्धा आहे उपाय
डासांना दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने खोलीत ठेवा. त्याचा सुगंध डासांना दूर ठेवतो. लसणाचा रस पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. निलगिरीचे तेल डासांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे.

डास चावल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका आणि पिवळा ताप हे आजार डासांमुळे होत असतात. लहान मुलांना डासांचा त्रास जास्त होतो. यामुळे डासापासून वाचण्यासाठी दारे आणि खिडक्यांवर जाळ्या लावल्या जातात. तसेच मॉस्किटो रिपेलेंटचा वापर केला जातो. त्याऐवजी नैसर्गिक उपाय स्वस्त आणि प्रभावी ठरणारे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button